सशक्त कृती आराखडा मदत कार्याचा


Plan of Action सशक्त कृती आराखडा मदत कार्याचा 



आम्ही अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रीसर्च एन्ड इन्फरर्मेशन इन्स्टिट्यूट.. मुबंई पुणे, नाशिक, बेळगाव नागपूर वरून जी मदत येईल ती देणगीदार कोल्हापूर व बस्तवडे ता कागल येथील मुख्यालयात जमा करून पुढे आम्ही ती वितरीत करीत आहोत. 

मदत कार्यात आम्हीं घाई करू इच्छित नाही. कारण आम्ही जाणतो की, खरी मदत ही पूर ओसरल्यानंतरच आहे. आम्हांला या पुरात नुकसान झालेल्या व्यक्तीच्या भावना, मनस्थिती ची पुरेपूर जाण आहे. त्यांनी त्यांचे घर, करियर, आर्थिक प्रगती, नाती, पद-प्रतिष्ठा या पुरात हरवली आहे. एक भारतीय मानवहित संस्था म्हणून आम्ही अशा व्यक्तींना त्यांचा हरवलेला मान-सन्मान, घर, करियर आणि आत्मविश्वास परत मिळवून देण्याची शपथ घेत आहोत. आमच्याकडून जमेल तसे व जमेल ती मदत त्यांना त्यांचे जीवनमान पुन्हा मिळवून देऊन, आनंदाच्या क्षणात पुराच्या दुःख छटा पुसून टाकण्याचा प्रयत्न करू इच्छितो.

हा मदत कार्यक्रम आम्हीं अंदाजे 2 ते 3 वर्षे राबविणार असून वेळोवेळी त्यातील बदल, व्यवस्था आणि प्रगती उल्लेखनीय असेल असा आम्हां सर्व संस्थेच्या संचालक, देणगीदार आणि पाठीराख्यांचा पूर्ण सुविश्वास आहे.

हे पुढीलप्रमाणे आदर्शवत कृती आराखड्यानुसार कार्य होईल.

कोल्हापूर आणि संस्था मुख्यालयात जमा झालेली मदत सर्व प्रथम विशेष दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी किंवा समकक्ष अधिकाऱ्यांच्या किंवा प्रतिष्ठित व्यक्ती समक्ष याचे निरीक्षण करून तहसीलदार यांच्या कडून आलेल्या यादीनुसार गावांची निवड (यात शासनाने प्रारीत केलेली ५०% व आमच्या संस्थेच्या व्यक्तिगत माहितीतील ५०% असा क्रम असेल) करू त्यानंतर सदर गावातील सरपंचांना याबत लेखी माहिती देऊन त्या गावातील तरुण मंडळे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी शिक्षिका, शिक्षक किंवा स्वयंस्फुर्त स्वयंसेवक यांच्या मार्फत रितशीर दप्तरी नोंद करून गरजू आणि आवश्यक असलेल्या तळागाळातील व्यक्तीलाच देण्याचा १००१% प्रयत्न राहील.

थोडक्यात आलेख खालील प्रमाणे


मुंबई -पुणे-नाशिक-नागपूर किंवा इतर सर्व ठिकाणांहून आलेली मदत
\ /
\ /
\ /
\_ 【★ अमर स्वराज्य संस्था ★】 _/
>>>>>>> तहसीलदार >>>गाव निवड (५०% शासन + ५०% स्व सूचि >>> सरपंच >>> स्थानिक तरुण मंडळे, आशा, अंगणवाडी शिक्षिका किंवा स्वयंस्फुर्त स्वयंसेवक यांच्या मार्फत >>> गरजवंत शेवटच्या व्यक्तीला मदत पोहचवली जाईल.

ही वितरण प्रणाली प्रत्येक टप्प्यावर संस्था दप्तरी नोंद असल्याने पुढील 100 वर्षात कधी ही देणगीदारांना निरीक्षण वा पडताळणी करू वाटले आणि त्यांनी केलं तर त्यांना अमर स्वराज्य संस्थे बरोबर उचित कार्यप्रणाली राबवून त्यांनी केलेलं दान, सुपात्री दिल्याचं वैश्विक आत्मिक समाधान लाभेल.

मदतीसाठी प्रधान्यक्रम

१. कोल्हापूर
२. सांगली
३. सिंधुदुर्ग

(कराड व पाटण साठी स्वतंत्र पणे टीम कार्यरत आहे, त्यामुळे ह्या तालुक्याचे नाव प्राधान्यक्रमात समाविष्ट केले नाही, नोंद घ्यावी.)

तळटीप :
१. गावांची निवड ही प्राधान्याने तंतोतंत गरज आणि जमाअसलेल्या मदती नूसारच असेल
२. कोल्हापूर आणि सांगली हा आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथील राजकिय, गुंडापावर आणि व्हीआयपी दबावाला आम्ही पुरेपूर परिचित आहोत. हा दबाव मदतकार्य कार्यक्रम राबविताना कुठेही अडथळा आणणार नाही याची आम्हीं सम्पूर्ण वैधानिक दखल घेतली आहे.
३. हा मदतकार्यक्रम किमान २ ते ३ वर्षे राबविण्याचा आमचा मानस आहे. (अंदाजे कालावधी)
४. व्यक्ती मर्यादा आम्हांला पण आहेत, आम्हीं आमच्या व्यवसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत करत हा कार्यक्रम राबवू.
४. तुमची मदत, कल्पना, विचार, सूचना आणि मार्गदर्शन आमच्यासाठी पार्थनीय आहे. त्यामुळे कामात गती येईल.

तुमच्या परिचतांपैकी कुणाला मदत करायची आहे पण वितरण कसे करायचे हा यक्ष प्रश्न असेल तर आम्हीं आहोत. सर्व ते वैधानिक सोपस्कार पूर्णत्वास आणून खरोखरच ज्याला गरज आहे त्या पर्यंत आपण केलेले दान सुपात्री देण्याची आम्ही ग्वाही देतो. फक्त विनंती एकच कोल्हापूर पर्यंत ती मदत आपण स्वखर्चाने पोचती करावी ही आर्त विनवणी.

हा कृती आराखडा सर्वांसाठी खुला आहे. कोणीही कॉपी करून अशा पद्धतीने मदत कार्य राबवू शकता. थोडासा वेळ लागेल पण पुरेपूर धर्मकार्य घडेल. प्रशासनाला त्रास न देता संपूर्ण लोकशाही पद्धतीने हा कार्यक्रम कार्य करेल. फक्त तुमची प्रबळ ईच्छा व सेवाभाव महत्वाचा.

अमरसिंह राजे

संस्थापक-अध्यक्षसॊ
अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च एन्ड इन्फरर्मेशन इन्स्टिटय़ूट®

admin
admin

This is a short biography of the post author. Maecenas nec odio et ante tincidunt tempus donec vitae sapien ut libero venenatis faucibus nullam quis ante maecenas nec odio et ante tincidunt tempus donec.

No comments:

Post a Comment