गेल्यावर्षी 2019 कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात पावसाने कहर केला आणि रेकॉर्डब्रेक महापूर
आला. या महापूरामुळे राजा व रंक सगळे एका रेषेत आले. पूर्वपुण्याई आणि अंग
मेहनतीने ज्यांनी गेल्या २५-३० वर्षात मिळवलं होतं त्यांचे निसर्गाच्या एका
पट्ट्यात पाण्यात गेलं. दर्यादिल कोल्हापूर-सांगलीकर हे अनेक वेळा देशाला प्रतिकूल
परिस्थितीत नेहमीच मदत करत आले आहेत. पण खुद्द कोल्हापूर-सांगली करांच्या वर मदत
घेण्याची वेळ येईल असे स्वप्नांत ही कुणाला वाटले नसणार, पण एक वेळ असते. त्यामुळे अनेकांनी कोल्हापूर-सांगली वर
मदतीचा वर्षाव केला. झालं ते काळे दिवस निघून गेले. सर्व काही हळूहळू पूर्ववत जगणं
सुरू झालं. पूर ओसरला असला तरीही निसर्गाने आपल्या खुणा ठेवल्या होत्या. मदतीने
खाण्या-पिण्याचा प्रश्न मिटला होता, पण हौसेने
बांधलेलं घर ! डोक्यावर असलेले छप्पर मात्र पुराच्या वेढ्याने खिळखीळ झालं. भिंती
जोड सोडत आहेत, भेगा पडल्या आहेत, एखाद्या मोठ्या वादळात होत्याचं-नव्हतं होऊ शकेल अशा घरात
आजही अनेक कुटुंब राहत आहेत. का ? आपली लहान मुलं, जीर्ण झालेल्या आई-वडिलांना घेऊन मोडकळीस आलेल्या असुरक्षित
घरात ही कुटुंब राहण्यास का मजबूर झाली आहेत. कारण मोडकळीस आलेलं घर मजबुतीकरण, बांधकाम-दुरुस्तीसाठी खर्चाची तजवीज नाही. बरीच घरे ही
वडिलार्जित परमपरेने चालत आलेली आहेत. ज्याचे रेकॉर्डिंग मध्ये लॅटिगेशन आहे.
त्यामुळे अशा प्रॉपर्टीला कर्ज मिळण्याची तिळमात्र शाश्वती नाही. कसेबसे दोन
वेळच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवण्या इतपत उत्पन्न...मग कर्ज घेऊन ते
फेडण्यासाठी हप्ता कसा भरणार !
अशा
विवंचनेत असलेल्या स्वाभिमानी लोकांच्यासाठी आम्हीं घेऊन येतो आहोत मदतीचा
हात...तोच तो कुसुमाग्रज यांच्या कवितेतील
कृष्णामाई आली घरा....
पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा'!
१.
उद्देश :
पुरामध्ये नुकसान झालेल्या किंवा जुन घर
पाडुन नवीन पक्क्या घराचे बांधकाम करणेसाठी कर्ज-देणगी स्वरूपात निधीचे वाट्प/मदत
वितरण करणे
२. कार्य
क्षेत्र :
फक्त ग्रामीण महाराष्ट्र राज्य
३. कर्ज मर्यादा : किमान २,२५,०००/- ते २५, ००,०००/- रुपये फक्त
४. कागद
पत्रे :
अ) केवायसी
1.
२0 ₹ कोर्ट फी स्टॅम्प,
2.
आधार-पॅन-मतदान ओळखपत्र Id २-२ साईज फोटो
(पती-पत्नी आणि ज्यांच्या नावे घरठाण उतारा आहे त्यांचे ही),
3.
कुटूंब प्रमुख पगार धारक असतील तर
मागील 6 महिन्याच्या पेमेंट स्लिप्स / फॉर्म नंबर 16, नेमणुक पत्र
4.
कुटूंब प्रमुख व्यवसाय करत असतील तर
व्यवसाय दाखला आणि व्यवहार करत असलेली मागील एक वर्षाची खतावणी
5.
कुटूंब प्रमुख शेतमजुर असल्यास
पुठ्ठ्यातील/गटातील किमान ३ सह-मजुराचे व
शेतमाल्काचे साक्षपत्र (नमुणा जोड्ला आहे)
6.
कुटूंब प्रमुखाचे मागील एक वर्षाचे
ते आत्तापर्यंतचे सर्व बँकेचे स्टेटमेन्ट (बॅंक स्टेटमेंयसाठी पैसे
आकारते त्यामुळे पैसे बचत करणेसाठी) पासबूक भरून घेऊन त्याच्या सर्व पानांच्या झेरॉक्स चालतील
7.
3 चेक सह्या करून अॅकाऊंट पे फक्त
ब) ग्रामपंचायत कडील कागदपत्रे
1.
चतुरसीमा दाखला (चौकोन काढून पूर्व, पश्चिम, दक्षिणउत्तर दिशेच्या
प्रॉपर्टी मालकाचे नाव),
2.
2005 ते 2020 असेसमेंट उतारा,
3.
बांधकाम परवाना किंवा घर दुरुस्ती
ना हरकत दाखला,
4.
प्रॉपर्टीकार्ड / गावठाण / वाढीव
गावठाण हद्दीतील असल्याचा दाखला ( घर शेतात- मळ्यात असल्यास ७/१२ उतारा),
5.
फेरफार (काहि नसल्यास तसे पत्र),
6.
जागा खरेदी दस्त (असल्यास),
7.
घरफाळा पावती,
8.
चालू लाईट बील,
9.
प्लॅन -एस्टीमेट वर ग्रामसेवक सही- शिक्का
( सध्या आवश्यक नाही, पण मंजुरी येणार तेंव्हा लागणारच)
क) फोटो
घराचे पूर्व- पश्चिम,
दक्षिण- उत्तर दिशेने काढलेले रंगीत फोटो
किमान ४ – कमाल १०




No comments:
Post a Comment